Ad will apear here
Next
चंद्रावर उल्कावर्षावातून जलवर्षाव
‘नासा’च्या नव्या संशोधनातील निष्कर्ष
मेरिलँड (अमेरिका) : चंद्रावरच्या पाण्यासंदर्भात नवा शोध ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना लागला आहे. चंद्राभोवतीच्या वातावरणात उल्कावर्षावादरम्यान पाण्याचा वर्षाव होतो, असे ‘नासा’च्या यानाने नोंदविलेल्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

ल्युनार अॅटमॉस्फिअर अँड डस्ट एन्व्हायर्न्मेंट एक्स्प्लोअर (लाडी) हे यान ऑक्टोबर २०१३ ते एप्रिल २०१४ या कालावधीत चंद्राभोवती फिरले होते. ते यान म्हणजे एक रोबॉटिक मिशन म्हणजे रोबोद्वारे पार पाडलेली मोहीम होती. चंद्रालगतचे वातावरण (एक्झोस्फिअर) कसे आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडण्यात आले होते. 

‘चंद्राभोवतीच्या वातावरणात बहुतांश वेळा पाणी (H2O) किंवा हायड्रॉक्साइड (OH) नसते; पण चंद्र जेव्हा उल्कावर्षावाच्या प्रवाहातून फिरतो, तेव्हा नोंदवली जाण्याएवढी वाफ तयार झाल्याचे आढळले. उल्कावर्षाव संपल्यानंतर पाणी किंवा हायड्रॉक्साइड हे घटक नाहीसे झाल्याचे आढळले,’असे या प्रकल्पावरील शास्त्रज्ञ रिचर्ड एल्फिक यांनी सांगितल्याचे ‘नासा’च्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. मेहदी बेन्ना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. 

या संशोधनामुळे चंद्रावरील पाण्याचा इतिहास समजून घ्यायला मदत होणार असून, चंद्राचा भूगोल आणि त्याची उत्क्रांती यांविषयीही अधिक जाणून घेता येणार आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे याआधीही सापडले आहेत; मात्र चंद्राच्या ध्रुवांनजीकच्या खड्ड्यांमधील बर्फाच्या स्वरूपात असलेले पाणी कसे आले, यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास या संशोधनातून मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

असे असले तरी, चंद्रावर असलेले सगळे पाणी या उल्कावर्षावातूनच आलेले नाही, असे त्याच प्रकल्पातील दुसऱ्या शास्त्रज्ञ डेना हर्ले यांनी स्पष्ट केले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQHBZ
Similar Posts
नासा आणि स्पेस एक्सची ऐतिहासिक मानवी अंतराळ मोहीम (व्हिडिओ) ‘नासा’च्या दोन अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्स कंपनीचे ‘द क्रू ड्रॅगन’ हे अंतराळयान ३१ मे रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले. स्पेस एक्स ही एलॉन मस्क यांची कंपनी असून, कोणत्याही खासगी कंपनीच्या यानाने अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळेच ही मोहीम ऐतिहासिक होती. बॉब
चांद्रभेटीची पन्नाशी! ‘अपोलो ११’च्या थरारक मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत... नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवले. त्या ऐतिहासिक घटनेला आता ५० वर्षे झाली आहेत. चंद्रावर उतरलेल्या त्या दोघांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी यानाचा जो भाग चंद्राभोवती ६० मैल उंचीवर फिरत राहिला होता, त्याचे पायलट मायकेल (माइक) कोलिन्स आपल्याला पन्नास वर्षांपूर्वीच्या
ऑडबनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघातर्फे गुरुवंदना कार्यक्रम ऑडबन (पेनसिल्व्हानिया) : अमेरिकेत मे महिना हा शिक्षकांच्या कार्याचे कौतुक (टीचर्स अॅप्रिसिएशन मन्थ) करण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने हिंदू स्वयंसेवक संघाच्या ऑडबन (पेनसिल्व्हानिया) शाखेने वार्षिक गुरुवंदना कार्यक्रम १९ मे रोजी आयोजित केला होता. वर्षभर शिक्षक विद्यार्थ्यांवर जी मेहनत
View of the current racial situation from an African American Hindu/Vedic leader I grew up in the South during the 1950s and 60s. Those were troublesome times for the African American community. We were identified as Negroes and as an ethnic minority, it was very difficult to understand what our place in the world was. Honestly, there was an element of shame associated with being black

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language